कै. काशिनाथ जायभाय माध्यमिक विद्यालय, दुरगाव व्यावसायिक विद्यार्थी इ.१० वी सन २०१६-१७ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Google search engine

कै. काशिनाथ जायभाय माध्यमिक विद्यालय, दुरगाव व्यावसायिक विद्यार्थी इ.१० वी सन २०१६-१७ बॅचचा स्नेहमेळावा काल उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात व आनंदामध्ये पार पडला.यावेळी खूप दिवसानंतर भेट झाल्याने माजी विद्यार्थी भावूक झाले होते.

एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा शिक्षक वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटनी मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. या समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद आर एस , शिक्षक निकत सर , पवार सर , गावडे सर , गदादे सर , सोनवणे सर , शिंदे सर , जायभाय सर बोराडे सर , शिपाई गदादे दत्तू , सुपेकर संदीप हे उपस्थित होते. कोमल निंबाळकर, विशाल लोंढे,निकिता भगत,माया केंदळे, पूजा शेलार, मनोज कुलथे, शरूख शेख,तानाजी सोनवणे, ओंकार कुलथे,करण जायभाय,सलीम पठाण,मंगेश जायभाय,अरबाज शेख ,ओंकार भगत,सानिया शेख,रामा बेळगे, विकास उकिरडे,विश्वास ससाणे,तुषार काळे,शेकर गायकवाड,बापू शिंदे,सुरज फरताडे,आलिशा मोगल आदी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सर्व नियोजन मुख्याध्यापिका सय्यद मॅडम यांनी केले.