राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी दत्तात्रय श्रीराम यांची बिनविरोध निवड 

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी दत्तात्रय श्रीराम यांची तर उपसरपंच पदी प्रमिला बबन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी

निलेश काकडे, प्रमिला बबन शिंदे, हनुमंत कांबळे ,दत्तात्रय श्रीराम, सावित्री सुभाष कोपनर,अशोक कोपनर,नीलम प्रवीण शेलार, प्रियांका दादा कोपनर आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मा .सरपंच प्रियांका दादा कोपनर व मा.उपसरपंच निलेश काकडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळाजी केसकर यांनी काम पाहिले .तर ग्रामपंचायत अधिकारी अविनाश म्हेत्रे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक म्हणून काम पाहिले.

यावेळी बोलताना सरपंच दत्तात्रय श्रीराम म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत. सरपंच पदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय श्रीराम यांचे व उपसरपंच पदी प्रमिला बबन शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.