
श्री दत्तकृपा फाउंडेशनचे साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, घारगाव येथील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष डी फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी एमएसबीटीई द्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. अमोल खेडकर , विभाग प्रमुख विक्रम पानसरे यांनी दिली. प्रथम वर्षाचा निकाल सरासरी 96 टक्के तर द्वितीय वर्षाचा 97 टक्के निकाल लागला.
प्रथम वर्ष डी.फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक सांगळे पुरुषोत्तम गोटू 74.30, द्वितीय क्रमांक तोडकर शुभांगी शिवाजी 71.50 तृतीय क्रमांक देवकर माधुरी अशोक 70.80 यांनी पटकावला. तसेच द्वितीय वर्ष डी. फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक बलदोटा रोहित राजेंद्र ७५.२७ द्वितीय क्रमांक राऊत प्रणाली विजय ७३.७३, तृतीय क्रमांक कांबळे स्नेहल गोविंद 73.18 यांनी पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दत्तकृपा शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे मॅडम व रजिस्टार श्री. कल्याण शिंदे सर , प्राचार्य डॉ.अमोल खेडकर , विभाग प्रमुख विक्रम पानसरे , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






