साईकृपा कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा 

Google search engine

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे आज दि.5 जून रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर हे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी आकाश दळवी सर यांनी पर्यावरण निर्मितीची संपूर्ण माहिती सांगितली. विविध वृक्षांची नावे, त्यांचे उपयोग तसेच औषधी वनस्पतींची माहिती सांगितली त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी साईकृपा कृषि महाविद्यालयच्या क्रिडांगण तसेच कॉलेज जवळचा परिसरात स्वच्छ्ता करण्यात आली. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे मॅडम तसेच संस्थेचे रजिस्टार श्री कल्याण शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .