
खरीप हंगामापूर्वी अवकाळी पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे, वापशाची वाट बघत, शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर वेगवेगळ्या पिकांचे वाण व खते खरेदीसाठी झुंबड उडाली आहे .
खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये मका, उडीद, तूर व बाजरी या पिकांच्या बियांना जास्त मागणी असून, या पिकांच्या क्षेत्रात कमालीची वाढ होणार आहे. सध्या कपाशी पिकाच्या बियाण्यांची कमी प्रमाणात मागणी होत आहे. या परिसरात सध्या तरी कपाशीची लागवड कमी होण्याची शक्यता वाटत आहे.
कृषी सेवा केंद्रातून मक्याचे विविध कंपन्यांचे १० ते १२, उडीदाचे ४ ते५ , तुरीचे ५ ते ६, बाजरीचे५ ते ७ तर कपाशीचे १० ते १५ वाण आले आहेत .
कर्जत तालुक्यासह आंबिजळगाव , शेगुड अंबिकानगर (बारडगाव सुद्रिक) परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रात मका, उडीद, तुर ,बाजरी, कपाशी सह ,इतर बियाणे उपलब्ध झाल्यानंतर ,चांगल्या प्रतीचे बियाणे व हवी असलेली खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी दिसत आहे.
प्रतिक्रिया :-
“20 मे पासून खते व बियाणे बाजारात आले असून, पाऊस थांबताचं, शेतकरी दुकानात येऊन खते व बियाणे खरेदी करत आहे.डी ए पी-१८:४६:०० या खतांची कमतरता असल्यामुळे, शेतकरी पर्याय खतांची खरेदी करत आहे.”
सुदर्शन कोपनर , कृषी सेवा केंद्र संचालक.






