
विश्वबंधुता साहित्य परिषद पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘सातवा विश्वबंधुता काव्य महोत्सव’ नुकताच एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे संपन्न झाला. या संमेलनामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना प्रतिष्ठेचा ‘विश्वबंधुता पुरस्कार’ विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके, कॉ.अजित अभ्यंकर, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. भारती जाधव यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
प्राचार्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






