कापरेवाडी सेवा सोसायटी निवडणुकीत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी सत्कार करून केले अभिनंदन 

Google search engine

 

कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलने 12-1 असे घवघवीत यश मिळवत होते.

भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेल ने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे व सर्व नवनिर्वाचित संचालक यांचा विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी प्रा .राम शिंदे यांनी पॅनल प्रमुख अनिल खराडे साहेब व संचालक कापरे मधुकर रवींद्र , कदम छबा शंकर, कदम दादा बाबा, खराडे विठ्ठल कोंडीबा जाधव गणपत एकनाथ, मुळीक स्वप्नील जनार्दन, मोडके मच्छींद्र लक्ष्मण, रेडेकर नागनाथ गोरख , सस्ते तात्या किसन , सौ धनवटे शांताबाई मारुती , सौ मिनाबाई बबन रोकडे , श्री विष्णु पोपट चव्हाण , बडाबाई तात्या कदम  आदी सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे अभिनंदन करत भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा.राम शिंदे साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळात कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करा असे आवाहन केले.यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर , कैलास अण्णा शेवाळे , दादासाहेब सोनमाळी , अशोक काका खेडकर , अनिल गदादे मंगेश दादा पाटील , काका ढेरे हर्षल शेवाळे , इंद्रजित शिंदे , चिंटू शेळके, सर्व संचालक , सरपंच , उपसरपंच उपस्थित होते.