
चिलवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी डॉ.विनायक जगताप यांच्या सिद्धिविनायक ग्राम विकास पॅनलचे अशोक विठ्ठल लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. संजय मारूती खैरे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सभेला ग्रामपंचायत सदस्य सतिश कांतीलाल फराडे , संजय मारूती खैरे , अशोक विठ्ठल लोंढे , कौशल्या सोमनाथ होले , राणी सचिन शिंदे उपस्थित होते.पाच सदस्य गैरहजर होते .
यावेळी अशोक विठ्ठल लोंढे व सतिश कांतीलाल फरांडे यांनी अर्ज भरले होते. परंतू वेळेत सतीश फरांडे यांनी माघार घेतल्यानंतर बिनविरोध निवड झाली.
यावेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच अशोक लोंढे म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी , मान्यवर व कर्मचारी वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त उपसरपंच यांचे समस्त ग्रामस्थ चिलवडी , होलेवाडी , सिध्दीविनायक ग्रुप चिलवडी , भारतीय जनता पार्टी चिलवडी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.







