मंथन राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर , निमगाव गांगर्डा ता.कर्जत येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

Google search engine

 

 

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर , निमगाव गांगर्डा तालुका कर्जत येथील शिवम भैरवनाथ अनभुले इयत्ता दुसरी या विद्यार्थ्याने राज्यात 16 वा , जिल्ह्यात 11 वा, केंद्रात 1 , प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच तिसरीतील शिवराज गांगर्डे याने राज्यात 24 वा , जिल्ह्यात 19 वा , केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला.चौथीतील वेदांत सचिन गांगर्डे याने राज्यात 18 वा , जिल्ह्यात 13 वा , केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.चौथीतील पंकज चक्रधर गांगर्डे याने राज्यात 23 वा , जिल्ह्यात 18 वा , केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा 2025 शिवम भैरवनाथ अनभुले जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला. शोर्य सायांबर ने जिल्ह्यात 14 वा , शिवराज गांगर्डे याने जिल्ह्यात 15 वा , वेदांत गांगर्डेने जिल्ह्यात 23 वा , माऊली अनभुले याने जिल्ह्यात 30 वा क्रमांक पटकावला.

मिळालेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती हनुमान नगर, सर्व शिक्षक वृंद ,पालक , ग्रामस्थ , निमगाव गांगर्डा यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.