मिरजगाव मध्ये सोमवारी भव्य दिव्य शाही विवाह सोहळा ,  विवाह सोहळ्यात वरराजा व वधुराणीचे हेलिकॉप्टरने आगमन होणार 

Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील आनंद मशिनरी चे सर्वेसर्वा तथा उदयोजक आनंदशेठ पाचपुते यांचे बंधू उद्योजक शुभम पाचपुते आणि कैलास दरेकर पाटील यांची कन्या आदिती दरेकर पाटील यांचा शाही विवाह सोहळा सोमवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजून २१ मी. मिरजगाव येथे संपन्न होणार आहे.

या लग्न सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भव्य दिव्य विद्युत रोषणाई , विवाह सोहळ्यात आकर्षक दिखावा ,भव्य दिव्य विद्युत रोषणाई , फटाक्यांची आतिषबाजी , स्वरसंगीताचा कार्यक्रम , इंडियन प्रीमियर मध्ये वाजणारे डीजे साँग आणि स्वादिष्ट , रुचकर जेवणाची मेजवानी असा हा विवाह सोहळा कर्जत तालुक्यासह सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या विवाह सोहळ्यास सर्व कर्जत तालुक्यातील नातेवाईक , आप्तेष्ट , मित्र परिवार यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण निमंत्रक उद्योजक आनंदशेठ पाचपुते आणि उद्योजक राहुलशेठ पवार यांनी केली आहे.

या विवाह सोहळ्यात वरराजा व वधुराणी चे आगमन हेलिकॉप्टरने आगमन विवाह स्थळी होणार आहे.