सर्व सामाजिक संघटनेला 12A , 80G प्रमाणपत्र बहाल

Google search engine

सर्व सामाजिक संघटनेला 12A , 80G प्रमाणपत्र बहाल

कर्जत तालुका हरित अभियान अंकित कर्जत येथील पर्यावरण व वृक्ष संवर्धन करणारी सर्व सामाजिक संघटना या संघटनेस धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांचा नोंदणी क्रमांक यासह एफ प्रमाणपत्र तसेच भारत सरकारच्या आयकर आणि कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून देखील सीएसआर मान्यता प्राप्त झाली आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून कर्जत शहर आणि परिसरात स्वच्छता वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनच्या माध्यमातून सलग श्रमदान करणाऱ्या कर्जत येथील कर्जत तालुका हरित अभियान अंकित सर्व सामाजिक संघटना करत असलेल्या कार्याला समाजाच्या विविध स्तरातून वस्तू व आर्थिक स्वरूपात सहकार्य मिळत असते या सर्व बळावरच आज पर्यंत सर्व सामाजिक संघटना हे आपले काम अविरत आणि सलग करत आली आहे. नुकतेच कर्जत तालुका हरित अभियान अंकित सर्व सामाजिक संघटनेला भारत सरकारच्या आयकर आणि कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून देखील 12A,80G सीएसआर मान्यता प्राप्त झाली आहे. या माध्यमातून समाजातील सर्व दानशूर व्यक्ती व संस्था हे आपले सहकार्य आता सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला देऊ शकतात यामुळे या मदतीद्वारे आपल्याला आयकरातून सूट मिळणे शक्य झाले आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था तसेच समाजातून विविध स्तरातून व येथील परदेशात असणाऱ्या नागरिकांकडून नेहमी सहकार्य होत आहे.आता दानशूर व्यक्ती व संस्था यांनी रीतसर पावती घेऊन रक्कम धनादेशाद्वारे जमा करून या पर्यावरण संवर्धनाच्या चांगल्या कार्याला सढळ हाताने मदत करू शकतात असे आवाहन संघटने मार्फत केले आहे.