
बेलवंडी ता. कर्जतचे संदेश सुशीलकुमार कांबळे यांची नुकतीच आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजेचं माहिती तंत्रज्ञान अधिकारी वर्ग -१ पदी बँक ऑफ बडोदा मध्ये निवड झाली.
संदेश यांचे आजी -आजोबा दोन्हीही प्राथमिक शिक्षक होते आणि आई नंदा पवार – कांबळे आणि सुशील कुमार कांबळे हे दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमधून पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कर्जत , उच्च माध्यमिक शिक्षण दादा पाटील महाविद्यालय कर्जत, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग , गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी(पुणे) येथून २०२० साली पूर्ण झाले.
आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या, स्पेशालिस्ट ऑफिसर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर या परीक्षेसाठी ,पूर्व परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये झाली आणि त्याची मुख्य परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये झाली . त्याची मुलाखत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आली.
त्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिकारी वर्ग -१, या पदी निवड झाली. त्यांची निवड झाल्याबद्दल सगळ्या परिसरामध्ये कौतुक होत आहे.
तसेच शेजारी – शेजारी ग्रुपच्या वतीने संदेश चा सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक घालमे, ज्ञानेश्वर गायकवाड, दत्ता काळे, सोमनाथ अनारसे ,शरद पवार , सतिश शेलार , राजेंद्र माने आदींनी शुभेच्छा दिल्या. संदेश कांबळे च्या आई नंदा कांबळे, वडील सुशीलकुमार कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रतिक्रिया
“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे” या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सातत्यानं आणि परिश्रमानं (अभ्यासाने) साध्य करता येतात.”
संदेश कांबळे – माहिती तंत्रज्ञान अधिकारी वर्ग-१






