विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते उद्या ‘ऑल इन वन-इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनल’चे ऑनलाईन लोकार्पण

Google search engine

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते उद्या ‘ऑल इन वन-इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनल’चे ऑनलाईन लोकार्पण

 

ग्रामीण विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात ‘डिजिटल स्कूल’ संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये ‘ऑल इन वन-इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनल’ उपलब्ध करून देण्यात आले असून, याचे ऑनलाईन लोकार्पण सोमवारी (७ एप्रिल) सकाळी ९.०० वाजता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सांगितले.

या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी आदी अधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे. या डिजिटल युनिटद्वारे विद्यार्थ्यांना कृतीशील आणि अनुभवाधिष्ठित शिक्षणाची संधी मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रस्थानी असतो आणि तो स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे शिक्षणात त्यांचा सक्रिय सहभाग वाढतो. ही संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.सभापती प्रा.राम शिंदे यांची संकल्पनेतुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची अनुभूती मिळणार आहे. मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील विविध भागात पॅनेलचे ८७ कीट तर जामखेड तालुक्यात २२ पॅनेल कीट देण्यात आले आहेत. ऑनलाईन लोकार्पणाची संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांचे योगदान आहे.त्यांनीच या कार्यक्रमाचे नियोजन केले असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच वेळी सर्व शाळांमध्ये लोकार्पण घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.