प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कर्जत-जामखेड मध्ये घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे : ना. प्रा. राम शिंदे

0
228
Google search engine

 

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कर्जत-जामखेड मध्ये घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे. ना. प्रा. राम शिंदे साहेब

महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत 22 फेब्रुवारी 2025 रोजी घरकुल लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायत मध्ये उपस्थित रहावे. व राज्य शासनाने चालवलेल्या अभियानामध्ये भाग घ्यावा. घरकुल बांधकाम साहित्य, घरकुल बांधकाम या अनुषंगाने उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पुर्ण केले तर उद्दिष्ट पुर्ती लवकर पुर्ण होईल व इतरही पात्र लाभार्थ्यांना या योजनेमध्ये भाग घेता येईल तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित राहुन आपल्या स्वप्नातील घरासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विधान परिषद सभापती ना.प्रा. राम शिंदे साहेब यांनी केले आहे.

महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत कर्जत-जामखेड तालुक्यातील एकुण मंजुर लाभार्थी 10072 यांना पत्र देण्यात येणार आहे पैंकी 7489 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. कर्जत तालुका एकुण लाभार्थी उद्दिष्ट 6258 पैकी 6123 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मिळणार आहे. तर जामखेड मधील लाभार्थी उद्दिष्ट 4088 पैकी 3949 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांला बोलावुन त्याचे स्वागत करुन त्याला पत्र वितरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने एकुण 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात येत आहे. व किमान 10 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सांयकाळी 4.35 वा होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्या अध्यक्षेते खाली ग्रामसभेचे आयोजन किमान 100 लाभार्थ्यांच्या करण्यात येणार आहे. उपस्थित घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्पा निहाय निधी वाटप प्रक्रिया बांधकाम साहित्याची उपलब्धता घरकुल बांधकाम आराखडा इत्यादी बाबत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप होईल व काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण ही होणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने महाआवास अभियान योजना 2024-25 युध्द पातळीवर राबवुन घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पुर्तीसाठी सर्वोतपरी प्रयत्न चालवलेले आहेत. पात्र लाभार्थीनी या संदर्भात संबंधित ग्रामपंचायती सी संपर्क साधुन घरकुलासंबंधी माहिती घ्यावी. तसेच थोड्याच दिवसामध्ये लाभार्थी निवड साठी शासन सर्वेक्षण करणार आहे. त्या संबंधिचे निकष थोड्याच दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत.