छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

0
187
Google search engine

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत कॉम्प्युटराईज  डोळे तपासणी व मोतिबिंदू तपासणी शिबिर सिध्दटेक ग्रामपंचायत येथे उत्साहात संपन्न झाले . या शिबिरात मोतिबिंदू , काचबिंदू , टेरीजियम , लासूर , तिरळेपणा , पडद्यावरील विकार , लॅसिक आदी तपासण्या मोफत झाल्या.

यावेळी या शिबिरास प्रमुख उपस्थिती अमोल भाऊ जगताप , युवा सेना उपजिल्हाप्रमुख , पुणे जिल्हा लाभले. यावेळी शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतल्याची माहिती संदीप बाबा मोरे , दादासाहेब भोसले पाटील , सतीश खोमणे सर , मिथुन सोमनाथ खोमणे यांनी माहिती दिली . या शिबिरास मदत फाउंडेशन चे सोमनाथ भाऊ खोमणे यांचे सौजन्य लाभले.

कार्यक्रमाची शोभा वाढवणारे हनुमंत भोसले, सचिन बनकर, ज्ञानदेव बनकर, तुकाराम बनकर, सखाराम तांदळे,नारायण लष्कर, संदीप लोंढे,अण्णा तात्या खोमणे, सुदाभाऊ खोमणे, दत्तात्रय सांगळे, संजय गायकवाड, देविदास घोडसे, करे सर, मधुकर भोसले, दशरथ परकाळे,रमेश भोसले, कार्यक्रमाला साहाय्य करणारे  पौरेश जाधव, राम भोसले, अक्षय घोडके,कृष्णा खुडे, रोहन नलगे, सोमनाथ भागुजी खोमणे, प्रज्वल खोमणे , चैतन्य मांढरे, ओंकार बनकर, शुभम मोरे, मयूर शेळके उपस्थित होते.