
शिवजयंती उत्सव मिरजगाव 2025 निमित्त छत्रपती केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी एकाच मैदानात 5 महाराष्ट्र केसरी 3 उपमहाराष्ट्र केसरी खेळणार आहेत. यामध्ये 3,11,000 रुपयांची असून पै.प्रकाश बनकर व पै.महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत होणार आहे. पै.सिकंदर शेख व पै.रविकुमार हरियाणा यांच्यात 3,11,000 ची कुस्ती होणार आहे. पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यात 3,11,000 रुपयांची कुस्ती होणार आहे. पै. बाला रफिक शेख विरुद्ध पै. माऊली जमदाडे यांच्यात ही लढत होणार आहे.
तसेच अन्य ही पैलवानांच्या लढती होणार आहे. या कुस्ती मैदानास प्रमुख उपस्थिती म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खा .निलेश लंके साहेब , आ.रोहित पवार , यांच्या आ.सुरेश अण्णा धस , मा. खा.सुजय विखे पाटील , आ.विक्रमसिंह पाचपुते , आ.संग्राम भैय्या जगताप , मा. आ.बाळासाहेब आजबे काका उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
पै.वैभव पवार 9736360707
छत्रपती केसरी , भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान स्पर्धेसाठी कुस्तीशौकिनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मा.राहुल शेठ पवार , अध्यक्ष छत्रपती उद्योग समूह यांनी केले आहे.






