टायगर करीयर अकॅडमी मिरजगाव , आष्टी यांच्या तर्फे मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या 29 विद्यार्थ्यांची विजयी रॅली मोठ्या उत्साहात संपन्न 

0
175
Google search engine

 

 

टायगर करीयर अकॅडमी मिरजगाव आष्टी यांच्या तर्फे मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या 29 विद्यार्थ्यांची विजयी रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली .या विजय रॅली साठी प्रमुख आकर्षण साई रथ व भैरवनाथ 11 होते . पोलिस दलात नोकरी करणे हे प्रत्येक स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास करणाऱ्याचे स्वप्न असते , हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी टायगर अकॅडमी 18 जिल्ह्यांसह मिरजगाव , आष्टी विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. सद्ध्या या अकॅडमी मध्ये 260 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सराव,अभ्यास करून भावी अधिकारी बनण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत . अकॅडमी चे संस्थापक हर्षद चौकडे सर यांनी कित्येक गरीब विद्यार्थ्यांचे पोलीस व अन्य सरकारी सेवेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हे स्वप्न नुकतेच पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विजय रॅली काल उत्साहात संपन्न झाली . मुंबईच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात 43 विद्यार्थी भरती झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत एकूण विद्यार्थी पोलीस , आर्मी , नेव्ही व इतर भरती मध्ये झालेले 1163 आहेत.

या विजय रॅली मूळे नुकतीच नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी प्रत्येक नवनियुक्त पोलीस विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी टायगर अकॅडमी , मिरजगाव यांचे संस्थापक अध्यक्ष हर्षद चौकडे सर यांचे आभार मानले.