अरविंदची उंचउडी पुन्हा जिल्ह्यात प्रथम , परीटवाडी शाळेची ऐतिहासिक कामगिरी ! 

0
217
Google search engine

 

क्रीडा स्पर्धेत यश मिळवण्याची शाळेची परंपरा पुन्हा एकदा जपली गेली. अरविंद कैलास साळुंके याची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाची मजल मारली. ही त्याची सलग दुसरी वेळ आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परीटवाडी या शाळेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा गुंफला गेला व सर्व जिल्ह्यात परीटवाडी शाळेचे, गावचे नाव उज्वल झाले.त्याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.

अहिल्यानगर जिल्हास्तर क्रीडास्पर्धा (सन . 2024 – 2025) नेवासा येथे पार पडल्या. या स्पर्धेत जि.प.प्राथ.शाळा, परिटवाडी (केंद्र – राशीन) शाळेचा विद्यार्थी कु. अरविंद कैलास साळुंके लहान गट मुले उंच उडी वैयक्तीक क्रीडाप्रकारात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन ! सर्व पंचक्रोशीतून, राशीन केंद्रातून अरविंद वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्याला कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी श्री. दशरथ धादवड , विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड ,मुख्याध्यापक ज्ञानदेव सुद्रिक यांची प्रेरणा मिळाली. अधिकारी वर्गाने त्याचा सत्कार करून त्याच्यावर शब्बासकीचे थाप टाकली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच या उंच उडीत श्रेयाचा वाटा असणारे, वेळोवेळी त्याचा उंच उडीचा सराव घेणारे शिक्षक गणेश भोसले व आशितोष लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. संपत फरांडे, नितीन पवार,प्रवीण शहाणे ,दिपाली शेजाळ व मंगेश कदम या शिक्षक वृंदाचे सहकार्य व शुभेच्छा मिळाल्या. अधिकारी, पदाधिकारी ,सर्व शा.व्या.समितीअध्यक्ष ,सदस्य ,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. या आनंदाच्या प्रसंगाच्या औचित्य साधून शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी त्याच्यावर अनेक बक्षिसांचा वर्षाव करत भेटवस्तू दिल्या .