विश्वनाथ अण्णा पावणे यांचा जळकेवाडी येथे विविध धार्मिक उपक्रमांनी भव्य शताब्दी महोत्सव संपन्न विष्णुयाग,तुलादान,पाद्यपूजन,हरिकीर्तन व भक्तिसंगीत कार्यक्रमांचे आयोजन

0
340
Google search engine

 

आजच्या धकाधकीच्या व गतिमान अशा तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मानवी जीवन हे ताणतणाव,नैराश्य,आजारपण, दु:ख यांनी व्यापलेले असल्याने शतायुषी माणसे अत्यंत अपवादानेच सापडतात. त्यातही अशा व्यक्तिंच्या जीवनात शंभरी पूर्ण केल्याचे आनंद सोहळे क्वचितच बघायला मिळतात. परंतु तालुक्यातील जळकेवाडी येथील विश्वनाथ ऊर्फ नारायण गेणू पावणे अण्णा यांचा शताब्दी महोत्सव अर्थात शंभरावा वाढदिवस सोमवार दि.१७/०२/२०२५ रोजी पावणे परिवार व त्यांच्या आप्तेष्टांनी तसेच जळकेवाडी ग्रामस्थ आणि सर्व स्नेहीजनांनी विविध धार्मिक उपक्रमा़ंनी साजरा करून समाजसमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला असे गौरवोद्गार स्वरगंधर्व ह.भ.प.श्री.सचिन म.मापारी , वैजापूरकर यांनी अण्णांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात निरूपण करताना काढले.’हरि आला हाता! मग कैची भय चिंता!’ या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर त्यांनी यावेळी कीर्तन केले.

शताब्दी महोत्सवाची सुरूवात सकाळी ८:०० ते दु.१:०० या वेळेत विष्णुयागाने झाली. यावेळी यज्ञीय पूजेसाठी ११ दांपत्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६:०० वा.पावणे परिवार व सर्व आप्तेष्ट यांनी अण्णांचे पाद्यपूजन करून १०० दिव्यांनी औक्षण केले.विधिवत अन्नतुला करून अण्णांच्या वजनाइतके धान्य व आर्थिक मदत कर्जत येथील निराधार मुलांच्या स्नेहप्रेम संस्थेला दान करण्यात आले. त्यानंतर सायं.७:०० ते रात्री ९:०० या वेळेत हरिकीर्तन झाले.यानंतर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे सध्या कार्यरत असलेले आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी प्रातिनिधिक शुभेच्छा देताना अण्णांच्या जीवनातील विविध प्रेरक प्रसंग सांगितले.शाळेची पायरी न चढता स्वत:चे भाचे श्री बापूराव ढवळे यांच्या साहाय्याने प्रौढ वयात साक्षर होऊन अनेक ग्रंथांची पारायणे करणारे व वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत पंढरीची नियमित महिनावारी करणारे कुटुंबवत्सल व निष्काम कर्मयोगी अण्णांचे जीवन आणि विचार सर्वांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी अभिष्टचिंतन करताना नमूद केले. यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व त्यानंतर स्वरगंधर्व पं.देविदास जाधव ऊर्फ झुका गुरूजी व शिष्यपरिवार यांचा अप्रतिम असा जागर अर्थात भक्तिसंगीत कार्यक्रम संपन्न झाला.दिवसभर चाललेल्या

या शताब्दी महोत्सवासाठी पावणे परिवारातील सर्व सदस्य,आप्तेष्ट, जळकेवाडी ग्रामस्थ तसेच कर्जत,जामखेड व आष्टी तालुक्यातील शिक्षकबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी मुलगा सुभाष व हरिदास नारायण पावणे मुलगी सौ आशाबाई बाजीराव शिंदे, मुलगी सौ सुशीला सुरेश लेकुरवाळे, सरपंच किरण उत्तम पावणे यांनी विशेष प्रयत्न केले. एक प्रेरणादायी व आदर्शवत असा शताब्दी सोहळा साजरा केल्याबद्दल पावणे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.या अभिष्टचिंतन सोहळ्यास आदरणीय श्री गोविंदमहाराज शिंदे,श्री अंबादास पिसाळ, श्री काकासाहेब तापकीर, श्री कैलासआण्णा शेवाळे, श्री अशोक खेडकर, श्री मनोरंजन धस साहेब, ,श्री महादेव वरडुळे सर,संचालक श्री बाळासाहेब तापकीर श्री एकनाथ चव्हाण सर,सर,श्री अप्पासाहेब घनवट, श्री प्रकाशतात्या कदम,श्री दत्ता ढवळे पाटील, धोंडपारगावच्या सरपंच सौ अर्चनाताई शिंदे, श्री. सुशीलकुमार धुमाळ, श्री दीपक शिंदे, श्री प्रदीप धुमाळ, श्री माधव शिंदे, श्री कालिदास गरड, श्री अशोक कदम, श्री सुखदेव मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.