
कापरेवाडी शिंदेवाडी ग्रूप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .रतन चंद्रकांत मूळे यांची बिनविरोध निवड झाली .
लोकनियुक्त सरपंच अनिल अशोक खराडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड संपन्न झाली.
यावेळी सभेला ग्रामपंचायत सदस्य सविता नवनाथ मोडके ,अयोध्या नामदेव कदम , निकेश बाळू तोरडमल , दत्तात्रय अनंता मोडके , योगेश रामदास कापरे , शीतल मस्छींद् खराडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच रतन चंद्रकांत मूळे म्हणाल्या , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने मूलभूत गरजा व इतर सुविधा आदी बाबींवर काम करणार आहोत.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल कवळे , नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष अश्रू धनवटे मेजर , अविनाश दिवटे, बबन रोकडे,संभाजी मंडलिक , मनीषा दिवटे , प्रवीण महाराज मूळे , नवनाथ मोडके ,भाऊराव वांगडे, सिद्धिनाथ मूळे , सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
चंद्रकांत मुळे यांनी गेली 20 वर्षे एकनिष्ठेने पार्टी साठी काम केले . त्यामूळे त्यांची उपसरपंच पदी निवड करुन पार्टीने मोठा सन्मान केला . एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना 100 टक्के संधी मिळते.
अविनाश अशोक दिवटे
संचालक मानसी एंटरप्रायजेस






