
प्रतिनिधी :-प्रा.राजेंद्र खराडे
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे व त्यांना तराजू,वजनमापे,पैसे तसेच आपण आणलेल्या वस्तूंची खरेदी किंमत किती होती आणि विक्री किंमत किती असावी आपण आणलेला माल कसा विकावा,मुद्दल किती होती आणि नफा किती झाला हे समजावे या हेतूने बाल आनंद बाजार हा उपक्रम आयोजित केला होता.त्या उपक्रमाच्या माध्यमातून स्कूलने विद्यार्थ्यांना घरून प्रत्येकाला वेगवेगळ्या पालेभाज्या,फळभाज्या,फळे, खाद्यपदार्थ व अनेक इतर वस्तू विक्रीसाठी आणायला सांगितल्या होत्या.विद्यार्थी त्या आणलेल्या सर्व वस्तू सिद्धटेक येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन बसले होते.सर्व विद्यार्थी आणलेल्या वस्तूची उत्साहाने जाहिरात करून विक्री करताना दिसले.विद्यार्थ्यांनी वांगी,बटाटी, टोमॅटो,लसूण,कोथिंबीर,मिरची,
वडापाव,भजेपावं,भेळ,फरसाण व इतर अनेक वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. विद्यार्थी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरात करायचे ओ मावशी,ओ काकू,ओ काका,मामा,दादा,ताई,ओ आजी, भाजी घ्या भाजी,भाजी लय स्वस्त खायला मस्त,घ्या घ्या वांगी, बटाटी, टोमॅटो, मिरची, लसूण,कोथिंबीर घ्या,अशाप्रकारे प्रत्येकजण आपल्या मालाची विक्री करताना दिसून आले.सर्व विद्यार्थी हे बाजारात आणलेल्या वस्तू विकण्यात खूप मग्न झालेले दिसून आले.हा बाल आनंद बाजार उपक्रम यशस्वी करण्यात शंभूराजे पब्लिक स्कूलचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले.






