करपडी ग्रामपंचायत सरपंच पदी अश्विनी नामदेव लाहोर यांची निवड

Google search engine

 

करपडी ग्रामपंचायत सरपंच पदी अश्विनी नामदेव लाहोर यांची निवड झाली . यावेळी आज सरपंच निवडीसाठी दोन अर्ज आले होते. यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अश्विनी नामदेव लाहोर यांना आवाजी ७ मतदान पार पडल्याने अभ्यासी अधिकारी यांनी त्यांची सरपंच पदी निवड घोषित केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ काळे, कैलास काळे, सुनीता काळे, इंदुमती काळे, शारदा मोहिते ,संतोष कांबळे उपस्थित होते.यावेळी दोन सदस्य अनुपस्थित राहिले.

यावेळी बोलताना सरपंच सौ.अश्विनी नामदेव लाहोर म्हणाल्या , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून सर्वांच्या सहकार्याने मूलभूत गरजा , सुविधा आदी बाबींवर काम करणार आहे.

नवनियुक्त सरपंच अश्विनी नामदेव लाहोर यांचे करपडीचे माजी सरपंच कैलास काळे, माजी सरपंच शिवाजी देशमुख, माजी सरपंच वैभव काळे,माजी सरपंच सतीश देशमुख,सो. चेअरमन संतोष लाहोर,व्हा . चे.बिबिषण मोहिते, सो.सदस्य रामभाऊ लाहोर, माजी सरपंच रामा देशमुख,गणेश लाहोर, आबा लाहोर, सर्जराव काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काळे ,स्वप्नील देशमुख,प्रहार तालुका अध्यक्ष, पैलवान श्रेयस देशमुख,ज्ञानदेव लाहोर,क्षत्रृघ्न लाहोर, योगेश लाहोर आदींनी सरपंच अश्विनी नामदेव लाहोर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.