महात्मा गांधी विद्यालयाचे अनिल पोपट सोनवणे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Google search engine

 

 

शेळगाव, इंदापूर येथील श्री अनिल पोपट सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाची शारीरिक शिक्षण विषयातील पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. ‘१४ ते १६ वयोगटातील धनुर्विद्या खेळाडूंच्या कौशल्यांवर व्हिडिओ अभिप्राय व तोंडी अभिप्राय यांच्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. नवीन धनुर्विद्या खेळाडू व धनुर्विद्या मार्गदर्शक यांना धनुर्विद्या खेळातील कौशल्य सुधारण्यासाठी तसेच मापन करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. श्री अनिल सोनवणे यांचे दहा शोधनिबंध विविध शोध पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. अनेक राष्ट्रीय परिसंवाद तसेच चर्चासत्रांमध्ये शोध निबंधांचे वाचन त्यांनी केले आहे.

ते धनुर्विद्या खेळाचे राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक आहेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांनी धनुर्विद्या खेळातील मार्गदर्शन केले आहे. सदर संशोधनात त्यांना जे. इ. एस. महाविद्यालय, जालना येथील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हेमंत वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे येथील शारीरिक शिक्षण संचालक व सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके तसेच स. प .महाविद्यालय पुणे येथील क्रीडा संचालक प्रा. रणजीत चामले यांचे देखील मार्गदर्शन त्यांना मिळाले. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या, महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहितदादा पवारसाहेब तसेच राजेंद्र तात्या फाळके,अंबादास पिसाळ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बापूराव धांडे तसेच दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजयजी नगरकर, रयतच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळूंजकर महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार चौरे, उपप्राचार्य लालासाहेब शिंदे पर्यवेक्षक राजेंद्र गीते,सौ सो.ना सोनमाळी विद्या मंदिर, कर्जतचे मुख्याध्यापक सुरेश भोईटे सर तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.