मे. आदिनाथ नामदेव मोढळे जनरल मर्चेंट अँड कमिशन एजंट, आडत दुकानाचे आ.रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत स्थलांतर राशीन मध्ये दुसरी राष्ट्रीयकृत किंवा कॉर्पोरेट बँकेची शाखा सुरू करा , राशीन व्यापारी असोसिएशन तर्फे आ .रोहित दादा पवार यांना मागणीचे निवेदन

Google search engine

 

मे. आदिनाथ नामदेव मोढळे जनरल मर्चेंट अॅण्ड कमिशन एजंट, आडत दुकानाचे मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी स्थलांतर करण्यात आले.

यावेळी कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकर देशमुख, माजी उपसरपंच शाहू राजेभोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, राम कानगुडे, उद्योजक माऊली कदम, बबनराव जंजीरे, नारायण जगताप, नवीन बोरा, राहुल मंडलेचा, भास्कर मोढळे, दिलीप आच्छा , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धोंडे, शहाजी राजेभोसले, योगेश शर्मा, विक्रम राजेभोसले, राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम कानगुडे, विजय मोढळे, बापू धोंडे, माऊली सायकर, दीपक काळे, गणेश सुद्रिक, रिपाइंचे भीमराव साळवे आदींसह व्यापारी , ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते .

राशीन व्यापारी असोसिएशनतर्फे व्यापाऱ्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाची एकमेव शाखा असून राशीनमध्ये दुसरी राष्ट्रीयकृत अथवा कार्पोरेट बँक आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन आमदार रोहित दादा पवार यांना दिले .

यावेळी आ.रोहित दादा पवार म्हणाले, येत्या सहा , सात महिन्यात राशीनमध्ये राष्ट्रीयकृत अथवा कार्पोरेट बँक सुरू केली जाईल. स्टेट बँकेची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बारामती सहकारी बँकेच्या शाखा कर्जत-जामखेड मतदार संघात सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बारामती अॅग्रीकल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन बियाणे दिल्याने

त्यांच्या उत्पन्नात ३० टक्क्याने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न राहणार नाही. कुकडीचे सिंचनाखाली क्षेत्र वाढले असून, राज्यमार्गाची कामे लवकरच पूर्ण होतील. राशीन येथे उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमच्या कामासाठी ‘सीएसआर’चा निधी मिळाला असल्याने येत्या काळात ही कामे सुरू होतील. आदिनाथ मोढळे यांनी स्वागत केले. मालोजीराजे भिताडे यांनी सूत्रसंचालक केले. आत्माराम मोढळे यांनी आभार मानले.