
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राक्षसवाडी बुद्रुक येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडली .यावेळी या क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ,शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड ,जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूराव शिंगाडे, विस्ताराधिकारी सुरेखा ठुबे, युवा नेते सुदर्शन कोपनर, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब तापकीर, शिक्षक नेते अशोक घालमे, केंद्रप्रमुख राजेंद्र राऊत, शांताराम दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
यावेळी लहान गट व मोठा गट यामध्ये सांघिक प्रकारात कबड्डी, खो-खो तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, लांब उडी , उंचउडी, थाळीफेक, गोळा फेक .या क्रीडा प्रकारात तालुक्यातील विविध बीट स्तरावर जिंकलेल्या शाळा सहभागी झाल्या.
या स्पर्धा संपल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला .
या सर्व स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्याची महत्त्वाची भूमिका, तालुक्यातील क्रीडा समितीच्या सदस्यांनी बजावली. यामध्ये जिल्हा क्रीडा महासंघाचे कार्याध्यक्ष अजित वडवकर, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजीराजे भोसले, क्रीडा समितीचे तालुकाध्यक्ष भरत तांबे ,सचिव दादा गदादे ,दादा शिंगाडे ,कैलास सुपेकर, दत्ता वायाळ, दिलीप लोंढे, पांडुरंग सातव, राजू शिंगाडे ,बापू सूर्यवंशी , अण्णा मासाळ आदींनी उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धा घेतल्या.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकाल खालील प्रमाणे :-
कबड्डी- लहान गट (विजयी) मुले जि .प. प्रा. शाळा बरकडे वस्ती तर मुली जि. प. प्रा शाळा दुरगाव,
कबड्डी- मोठा गट (विजयी) मुले -देशमुखवाडी,मुली -दुरगाव
खो -खो -लहान गट (विजयी) मुले व मुली दोन्ही गट राक्षसवाडी बुद्रुक तर
मोठा गट (विजयी ) मुले व मुली दोन्ही गट नवसरवाडी यांनी जिंकले.
धावणे- लहान गट(विजयी) -आप्पासाहेब जनार्दन पुराने बाबुळगाव खालसा तर स्नेहल भीमराव पवणे रेडेकर वस्ती.
मोठा गट- (विजयी )ओंकार केशव जाधव करमणवाडी, मोहिनी अशोक बानगुडे नवसरवाडी ,
गोळा फेक -मोठा गट (विजयी) आविष्कार संदीप कानगुडे गणेशवाडी,श्रुती शंकर काळे देशमुख वाडी .
थाळीफेक- मोठा गट (विजयी)स्वराज अनिल कांबळे मिरजगाव (मुले), मनीषा मोहन गदादे आळसुंदे .
लांब उडी -लहान गट (विजयी) आर्यन संजय काळे करपडी ,जानकी वसंत मापारी वेताळ वस्ती .
मोठा गट- (विजयी) यशराज पिंटू सुरवसे थेरवडी, पुनम अशोक धनवडे कापरेवाडी .
उंचउडी -लहान गट(विजयी) अरविंद कैलास साळुंखे परीटवाडी ,आर्या रामदास पाटोळे वालवड.
मोठा गट- यशराज पिंटू सुरवसे थेरवडी ,पूनम अशोक धनवडे कापरेवाडी. यावेळी संतोष घेरडे, दत्ता काळे , शिवाजी बांदल,दीपक कारंजकर, बजरंग गोडसे, सुनील बेलकर ,विठ्ठल श्रीराम ,संदीप जाधव , अंकुश झिंजे, शरद पवार ,संभाजी टकले,प्रकाश नेटके आदी तालुक्यातील आलेले सर्व शिक्षक ,विद्यार्थी, खेळाडू ,पालक उपस्थित होते .
प्रतिक्रिया
“तालुक्यातून आलेल्या सर्व गटातील खेळाडूंनी, चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. या खेळाडूंनी खेळात कष्ट , परिश्रम तसेच सरावात सातत्य ठेवल्यास, हे बाल खेळाडू भविष्यात ऑलिंपिकचे खेळाडू होतील.”
– उज्वला गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी ,कर्जत.






