
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १२/जानेवारी २०२५ या कालावधीत कर्जत तालुक्यातील पठारवाडी या ठिकाणी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निवासी शिबिराच्या माध्यमातून ग्रामविकास जनजागृती, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, नाला खोलीकरण यासारखे उपक्रम राबविले गेले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हे उपक्रम राबवित असताना पठारवाडी येथील दानशूर ग्रामस्थांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना सकाळी नाष्टा, दुपारी व संध्याकाळी स्वादिष्ट जेवण दिले. या अन्नदात्यांमध्ये पठारवाडीचे सरपंच शरद यादव, माजी सरपंच विजूकाका तोरडमल, उपसरपंच गहिनीनाथ पठाडे, सागर लाळगे, मोठा पठाडे, आतिश पठाडे, संघर्ष युवा प्रतिष्ठानचे सुरेश पठाडे, दादा पठाडे, शेखर पठाडे, यशवंत पठाडे, जालिंदर चौधरी, प्रमोद पठाडे, श्रीकांत पठाडे, दत्ता गोडसे, दत्ता पठाडे, हरी चौधरी, अमर शिंदे, अतुल कदम, शिवाजी पठाडे , बापूराव तोरडमल, नितीन तोरडमल, मोहन शिंदे, शशिकांत भोंगाणे, किरण चौधरी, स्वप्निल पठाडे प्रवीण प्रवीण या ग्रामस्थांनी सात दिवस अन्नदानाचे पुण्य काम केले. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी त्यांच्या या पुण्यकार्याबद्दल सर्वांचा गौरव केला.
सदर अन्नदानाचे संपूर्ण नियोजन शेखर पठारे, विजूकाका तोरडमल व प्रवीण पठाडे यांनी पार पाडले. त्यांच्या या कार्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होत असून अनेकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






