कबड्डीचे मैदान दुरगावच्या मुलींनी गाजवले

Google search engine

 

सोमवार दि. १३/०१/२०२५ रोजी जनता विद्यालय राक्षसवाडी बुद्रुक येथे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत दूरगाव शाळेच्या लहान गट व मोठा गट मुलींनी कबड्डी स्पर्धेत विजय संपादन करून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.या विजयासाठी शाळेतील उपाध्यापक प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बजरंग गोडसे ,युवा प्रशिक्षणार्थी अमोल मांडगे , दशरथ देशमुख,काशिनाथ जायभाय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादा गदादे , बाळकृष्ण काळे व शाळेचे मुख्याध्यापक रमेश सुपेकर व शाळेतील शिक्षक स्टाफने कष्ट घेतले.या विजयाने दूरगाव शाळेची क्रीडा स्पर्धेतील विजयाची परंपरा कायम राखली.या विजयाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड , कोंभळी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा ठूबे , केंद्र प्रमुख राजेंद्र राऊत, शांताराम दिवेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच दुरगावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जायभाय व सर्व समिती सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.