सोनाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या आ .रोहित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न होणार  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सरपंच बाळासाहेब काळे यांचे आवाहन 

Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा १४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच बाळासाहेब काळे यांनी केले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाची ही इमारत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत १५ लाख रुपये आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २० लाख रुपये असा एकूण ३५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आली आहे.

उपसरपंच वंदना दीपक बेलेकर, सदस्य सुवर्णा अंकुश सायकर, शोभा मच्छिंद्र सुरवसे, विजया ज्ञानदेव काळे, संजय अंकुश भोंडवे, रेखा नवनाथ सूर्यवंशी, बंडू भीमराव काळे, राजेंद्र गोरख सौताडे, महादेव बापूराव गोडसे तसेच ग्रामसेवक ए. बी. गलांडे, प्रशासक ए. आर. क्षीरसागर व ग्रामपंचायत कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.