
परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध व परभणी येथील समाज कंटकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आज भीमरत्न तरुण मंडळ , सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज खेड बंदची हाक देण्यात आली असून सकाळी ६ ते २ यावेळेत बंद पाळण्यात येणार आहे.
परभणी येथील संविधान विटंबना तसेच परळी येथील सरपंचांची निर्घृण हत्या तसेच अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ खेड येथे आज सकाळी ६ ते २ या वेळेत भीमरत्न तरुण मंडळ , खेड तसेच सर्व ग्रामस्थ , सर्व पक्ष यांच्या वतीने खेड येथे आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे .






