
आज संपूर्ण महाराष्ट्रात विलक्षण चर्चेत आसलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून आवघ्या ११०० मतांनी पराभव झालेले उमेदवार राम शिंदे साहेब यांची विधान परिषद सभापती म्हणून निवड झाली. प्रथमतः आ . प्रा.राम शिंदे साहेब यांचे मनापासून आभार
१ गोष्ट मात्र शिकायला भेटली. राजकीय व्यक्तिमत्व एकमेकांना विरोध करतात, पण त्याच्या कितीतरी पटीने सर्वसामान्य व्यक्ती, कार्यकर्ते विशिष्ट राजकीय व्यक्ती प्रमाण मानून टोकाचे विरोध करतात, या विरोधाचे रूपांतर गावागावांतील सामाजिक संबंधात होते.. निवडणुकीच्या काळात केलेला विरोध व्यक्ती व्यक्तिशः घेतल्यामुळे अनेक कुटुंबे एकमेकांपासून दूर होतात. या विरोधाचे व्यक्तिगत परिणामी सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात.
राजकीय नेत्यांचे राजकीय अपयश युत्या, आघाड्या राजकीय तडजोडी इत्यादी मार्फत भरून कडले जाते. परंतु राजकीय द्वेष प्रमाण मानून दोन व्यक्ती किंवा समाज यांची होत असलेली सर्वांगीण अधोगती केव्हाच भरून काढता येत नाही.
त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि कार्यकर्ता यांनी निवडणुकांकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिले आणि विरोध हा जात, पत, धर्म, व्यकी हे सोडून विकासाच्या मुद्यावर केला, तर कुठेतरी होणार सामाजिक अधपतन थांबेल , असे वाटते.
आपला – अमोल रोहिदास सकट






