अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध , त्यांनी जाहीर माफी मागावी : भास्कर भाऊ भैलुमे , पै.विकास भाऊ रंधवे , संजय बाबा भिसे , पिंटू साबळे 

0
192
Google search engine

 

आज तुम्ही जिथे बोललात तिथे आज बाबासाहेबांमुळेच आहेत. अमित शहा तुम्ही राजीनामा द्या. नाही तर देशभर याचे पडसाद उमटतील अशी प्रतिक्रिया  भास्कर भाऊ भैलुमे नगरसेवक , कर्जत नगर पंचायत , पै.विकास भाऊ रंधवे अध्यक्ष – बहुजन रयत परिषद कर्जत तालुका, मा. उपसरपंच भांबोरा , श्री. संजय बाबा भिसे जिल्हाध्यक्ष-बहुजन रयत परिषद अहिल्यानगर , श्री.पिंटू साबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग यांनी प्रतिक्रिया देत अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशाचे गृहमंत्री बोलतात ही काय पद्धत आहे? हे बेजबाबदारपणाच वक्तव्य आहे. हे उचित नाही. आम्हीच नाही, हा संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. बाबासाहेबांचे उपकार आमच्यावर आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी माफी मागावी अशी मागणी आमची आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश द्वीपस्तंभाप्रमाणे चालत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटले .डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ आहेत. असे ते यावेळी म्हणाले. या घटनेचा निषेध म्हणून कर्जत मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.