अशोक उढाणे यांना पीएच.डी पदवी प्रदान

0
294
Google search engine

 

 

 

आष्टी तालुक्यातील पिंपरी(घुमरी) येथील आदर्श शिक्षक अशोक दत्तू उढाणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांची शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च असणारी पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त झाली आहे.

अशोक उढाणे यांनी “साठोत्तरी मराठी कादंबर्‍यांमधून चित्रित झालेले शालेय व शैक्षणिक जीवन” या विषयावर संशोधन पूर्ण करून विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांना या संशोधनासाठी चेतना वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अरूण कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करताना या अगोदरही उढाणे यांनी एम.बी.ए(एच.आर), बी.जे(प्रिंट मिडिया), पेट(मराठी), सेट(मराठी), एम.ए(इंग्लिश,मराठी), बी.एस्सी. बी.एड(मॅथ), डी.एस.एम अशा पदव्या मिळवून उच्च शिक्षण घेतले आहे.   त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री आदरणीय सुरेश(आण्णा) धस, आयएएस अधिकारी संदीप पांडूळे, तहसिलदार शारदा दळवी, नायब तहसिलदार प्रदीप पांडूळे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, प्रशांत शिंदे, सुरेश पवार, मोहनराव जगताप, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष मारूती पठाडे, महेशकुमार शिंदे, अशोक लटपटे तसेच सर्व संचालक मंडळ, विस्तार अधिकारी नितीन गायकवाड, प्रा.डॉ. विधाते सर, प्रा.डॉ. चौधरी सर, डॉ.शेळके, भवर सर, शिवराम होळकर, भास्कर नलावडे, भास्कर ढोबळे, अशोक झिंजूर्के, सरपंच दादा पांडूळे, दत्तू खोटे,मुख्याध्यापक काळे सर, सुभाष लवांडे, सुहास वाळके, देवदत्त जगताप, चेअरमन नवनाथ जगताप, देविदास परकाळे, अमोल उढाणे, अशोक पठाडे, निवेदक विठ्ठल तोरडमल, सावता ससाणे, दत्ताभाऊ होळकर, सभापती संजय ढोबळे, डॉ. आण्णासाहेब हजारे, पोपट गावडे, वैभव तळेकर, महेश महाडिक, गणेश झिंजुर्के, मयुर महाडिक, कृष्णा सुर्यवंशी, इंजि.अमोल भोगाडे, गणेश होळकर, केंद्रप्रमुख सुरेश मिरगणे, बाबासाहेब झिंजुर्के,सावंत मॅडम,शेंडगे सर, मुख्याध्यापक संजय दहातोंडे, चांगदेव तरटे, राजकुमार मोरे, हिरामन पोकळे, दिलीप उढाणे, कानिफनाथ जगताप, मच्छिंद्रनाथ जगताप, देवराव परकाळे,प्रा.सुकुमार परकाळे,हरिश्चंद्र हातवटे, राहुल मुटकुळे, आजिनाथ साखरे,बाबासाहेब बनसोडे,आजिनाथ पांडूळे आदींनी डॉ.अशोक उढाणे यांचे अभिनंदन केले.