कापरेवाडी शिंदेवाडीतील शेतीपंपांना रोज ८ तास वीज द्या , लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे यांची मागणी ,अन्यथा उपोषण  

0
496
Google search engine

 

 

गेल्या चार-पाच वर्षापासून कापरेवाडी शिंदेवाडी गावांना शेतीपंपाची वीज रब्बी हंगामात दिवसाआड मिळत आहे , ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात दिवसाआड वीज मिळत आहे. रोज वेळेवर वीज मिळण्यासाठी आपल्याकडे गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे परंतु आपण सदर अडचण सोडवण्यास वेळोवेळी टाळाटाळ करत आहात. शेतीला वेळेवर पाणी न देता आल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. येणाऱ्या आठ दिवसात शेती पंपाला नियमानुसार रोज ८ तास वीज न मिळाल्यास सर्व शेतकरी बांधव कापरेवाडी शिंदेवाडी यांच्यावतीने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया अनिल खराडे  , अध्यक्ष भाजपा कर्जत, कामगार आघाडी लोकनियुक्त सरपंच कापरेवाडी शिंदेवाडी यांनी केली आहे.निवेदनाची प्रत प्रा रामजी शिंदे साहेब, आमदार , कार्यकारी संचालक महावितरण, मुंबई , मुख्य अभियंता , महावितरण नाशिक ,अधीक्षक अभियंता, अहिल्यानगर , तहसीलदार , कर्जत तालुका , पोलिस निरिक्षक, कर्जत पोलिस स्टेशन यांना देण्यात आली आहे.