आमदार रोहित दादा पवार यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामामुळेच विजय : प्रा.प्रकाश धांडे 

0
261
Google search engine

 

गेल्या दहा वर्षात जो विकास झाला नाही तो आमदार रोहित दादांनी ५ वर्षात करून दाखविला म्हणून आ.रोहीत दादांचा विजय हा जनतेच्या विश्वासाचा आणि इच्छाशक्तीचा विजय आहे असे प्रतिक्रिया प्रा.प्रकाश धांडे यांनी दिली. भूमिपुत्र आणि विकास करणारा पुत्र अशी लढत झाली यामध्ये भूमीपुत्राला कर्जत जामखेडकरांनी नाकारलेअसेही ते यावेळी म्हणाले.रोहितदादा पवार हे एक अभ्यासु,सुशिक्षित व तरुण नेतृत्व आहे .आमदार रोहितदादा पवारांनी कर्जत जामखेड मतदार संघ कुटूंबा प्रमाणे जपला , त्यामुळे त्यांचा विजय झाला.

सर्व नेते एका बाजूला आणि रोहित दादांचे निष्ठावान कार्यकर्ते एका बाजूला यामध्ये स्वाभिमानी निष्ठावान कार्यकर्ते यामुळे आ.रोहीत दादांचा विजय सुकर झाला असे ते यावेळी म्हणाले.आ. रोहितदादा यांचा विजय हा केवळ राजकीय नसून सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या विश्वासाचा आणि इच्छाशक्तीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया आनंद भगत यांनी दिली.मतदारसंघातील जनतेने नेतेमंडळींच्या प्रभावाखाली न राहता विकासपुत्र आ .रोहीत दादांना मत दिले.

तालुक्यातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून येथील स्वाभिमानी जनता आता पूर्वीसारखी कोणाच्याही दबावाला बळी न पडता विकासाच्या पाठीमागे विकासाच्या पाठीमागे उभा राहिले आहे असे ते यावेळी म्हणाले. आ.रोहीत दादा व त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर जावून टीका केली मात्र विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची जनतेची भूमिका स्पष्ट झाली. विरोधकांनी या निवडणुकीत कितीही प्रयत्न केले असले, तरी रोहितदादा यांची प्रतिमा एक व्हिजन असलेले आमदार , सक्षम आणि विकासाभिमुख आमदार म्हणून अधिक ठळक झाली. नेतेमंडळींच्या पाठिंब्याचा अभाव असूनही, जनतेने आपले मत व्यक्त करत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली. नेत्यांचा पराभव म्हणजे त्यांच्या ताकदीवरील प्रश्नचिन्ह ठरले, तर आ. रोहित पवार यांच्या यशाने जनतेच्या विश्वासाला योग्य दिशा मिळाली. सर्वसामान्य जनतेच्या या विजयाने राजकारणात नवीन दिशादर्शक पायंडा पाडला आहे. या निवडणुकीत रोहितदादांना मिळालेला विजय हा विकासाचे , कर्जत जामखेड मतदार संघाचे आगामी काळातील विकासाचे प्रतीक ठरतो. त्यांनी त्यांच्या कामगिरीने आणि जनहितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील लोकांचे मन जिंकले. कर्जत- जामखेड मतदारसंघाने नेत्यांच्या प्रभावाला न जुमानता, विकासाला प्राधान्य दिल्याचे या निकालावरून स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.