
जनतेचे महत्त्व अधोरेखित करणारी निवडणूक प्रत्येक निवडणूक ही नेहमी वेगळी असते.याच प्रकारे यावेळी झालेली विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड मधील लढत ही अनेक अर्थानी वेगळी होती व ती भविष्याला दिशा देणारी निर्णायक लढत ठरली.या मतदार संघात एका बाजूला तालुक्यातील बहुतांश गावापासून तालुका स्तरापर्यंत असलेले सर्व छोटे मोठे नेते होते व दुसऱ्या बाजूला जनता असा हा सामना होता. एका पक्षाकडे सर्व प्रतिष्ठित नेते होते व दुसऱ्या बाजूला सामान्य जनता या लढतीमध्ये जनता विजयी ठरली. या निकालातून जनतेने दाखवून दिले की जनता नेते घडवू शकते व त्यांना घरी बसवू पण शकते. जेथे जनता असते तेथेच नेते असतात जेथे नेता असतो तेथे जनता नसते जनता ही स्वतंत्र व सार्वभौम असते तिच्यावर कोणाचीही मक्तेदारी चालत नाही कोणत्याही आमिषाने तिला बळी पाडता येत नाही कर्जत जामखेड मधील लढत ही देशाला दिशा देणारी निर्णायक लढत होती.येथील जनतेने विकासपुत्र मा. आ. रोहित (दादा) पवार यांना निवडून दिले आहे. येथील जनतेनं आपले बहुमत हे विकासाला दिले आहे.






