
आ. रोहितदादा यांचा विजय हा केवळ राजकीय नसून सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या विश्वासाचा आणि इच्छाशक्तीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया सचिन मांडगे यांनी दिली.मतदारसंघातील जनतेने नेतेमंडळींच्या प्रभावाखाली न राहता विकासपुत्र आ .रोहीत दादांना मतदान रुपी आशीर्वाद दिला . यामुळे विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची मतदार राजाची भूमिका स्पष्ट झाली. विरोधकांनी या निवडणुकीत कितीही प्रयत्न केले असले, तरी रोहितदादा यांची प्रतिमा एक व्हिजन असलेले आमदार , सक्षम आणि विकासाभिमुख आमदार म्हणून अधिक ठळक झाली. नेतेमंडळींच्या पाठिंब्याचा अभाव असूनही, जनतेने आपले मत व्यक्त करत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली. नेत्यांचा पराभव म्हणजे त्यांच्या ताकदीवरील प्रश्नचिन्ह ठरले, तर आ. रोहित पवार यांच्या यशाने जनतेच्या विश्वासाला योग्य दिशा मिळाली. सर्वसामान्य जनतेच्या या विजयाने राजकारणात नवीन दिशादर्शक पायंडा पाडला आहे. या निवडणुकीत रोहितदादांना मिळालेला विजय हा विकासाचे , कर्जत जामखेड मतदार संघाचे आगामी काळातील विकासाचे प्रतीक ठरतो. त्यांनी त्यांच्या कामगिरीने आणि जनहितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील लोकांचे मन जिंकले. कर्जत- जामखेड मतदारसंघाने नेत्यांच्या प्रभावाला न जुमानता, विकासाला प्राधान्य दिल्याचे या निकालावरून स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.जनतेचे महत्त्व अधोरेखित करणारी निवडणूक प्रत्येक निवडणूक ही नेहमी वेगळी असते.याच प्रकारे यावेळी झालेली विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड मधील लढत ही अनेक अर्थानी वेगळी होती व ती भविष्याला दिशा देणारी निर्णायक लढत ठरली.या मतदार संघात एका बाजूला तालुक्यातील बहुतांश गावापासून तालुका स्तरापर्यंत असलेले सर्व छोटे मोठे नेते होते व दुसऱ्या बाजूला जनता असा हा सामना होता. एका पक्षाकडे सर्व प्रतिष्ठित नेते होते व दुसऱ्या बाजूला सामान्य जनता या लढतीमध्ये जनता विजयी ठरली. या निकालातून जनतेने दाखवून दिले की जनता नेते घडवू शकते व त्यांना घरी बसवू पण शकते. जेथे जनता असते तेथेच नेते असतात जेथे नेता असतो तेथे जनता नसते जनता ही स्वतंत्र व सार्वभौम असते तिच्यावर कोणाचीही मक्तेदारी चालत नाही कोणत्याही आमिषाने तिला बळी पाडता येत नाही कर्जत जामखेड मधील लढत ही देशाला दिशा देणारी निर्णायक लढत होती.येथील जनतेने विकासपुत्र मा. आ. रोहित (दादा) पवार यांना निवडून दिले आहे. येथील जनतेनं आपले बहुमत हे विकासाला दिले आहे.






