
आ.प्रा.शिंदे साहेब विकासकामांच्या कर्तुत्वावर २० ते २५ हजार मतांच्या लीडने निवडून येतील अशी ग्वाही कृष्णा लोखंडे मा.सरपंच वडगाव तनपुरा यांनी दिली.
कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली असून भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने आघाडी घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागे राहून त्यांनी मतदान करून साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आ.राम शिंदे साहेब सज्ज झाले आहेत.आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला असून होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मागणी केलेले ग्रामपंचायत वडगाव मध्ये एखादे किरकोळ कामही पूर्ण झाले नाही या उलट भारतीय जनता पार्टीची जामदार वाड्यावरील निष्ठा पाहून आमच्या गावातील सिंगल फेज वीज कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून चार वर्ष बंद केली . त्यांनी कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे विकास काम केले नाही. समृद्ध गावचे काम झाले परंतु कार्यकर्त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. काही थोडीफार डागडूजी करून रस्त्याची बिल काढली. विचारणा केली असता जामदार वाड्याचे नाव काढले की विषय बदलायचा अशी खुनशी भूमिका ते घ्यायचे. असे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून ऐकायला भेटायचे . एक आमदार म्हटले की सर्वपक्षीय भूमिका एकसमान घेतली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असो. गावामध्ये विकास काम झालं पाहिजे, अशी काम आमदाराने किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने केली पाहिजे. अशी माझी स्वतःची स्पष्ट भूमिका आहे. प्राध्यापक राम शिंदे आमदार होते तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचे काम कधी अडवले नाही तर ती प्राधान्याने करून दिली. कुठल्याही कार्यकर्त्याची कधी अडवणूक केली नाही. विकास कामाला तर त्यांनी कधीच खोडा घातला नाही कधी भूलथापा मारल्या नाहीत. गरीब घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळे खुन्नस आणि अहंकार त्यांच्या अंगी कधी दिसलाच नाही. म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यावर एक निष्ठेने प्रेम करतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाच रान करतो. मी बूथ प्रमुख या नात्याने आज पर्यंत साहेबांना कायम मताधिक्याने पुढेच ठेवले आहे आणि म्हणून आ.प्रा.शिंदे साहेब त्यांच्या कामाच्या कर्तुत्वावर किमान २० ते २५ हजार मतांच्या लीडने येतील अशी माझी खात्री आहे .






