
आ. रोहितदादा पवार यांचे नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व असून महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये ४३ हजार मतांनी निवडून आल्यानंतर आ .रोहित दादांचे फक्त निवडणुकी अगोदर दोन महिने काम होते तरी लोकांनी एवढा विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर त्याच कामाच्या रूपाने आ.रोहित दादा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले व प्रत्येकाचा हृदयामध्ये स्थान निर्माण केले म्हणून ” फिरसे दादा “असे म्हणत त्यांनी आ.रोहीत दादा यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडी अडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे रुईगव्हानच्या मा.सरपंच सौ.अश्विनी दत्तात्रय जामदार यांनी म्हटले आहे.
आ.रोहीत दादा पवार यांनी रुईगव्हान साठी मा.सरपंच सौ.अश्विनी दत्तात्रय पवार व त्यांच्या भगिनी मा.सरपंच इंदिरा निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांची विकासकामे दिल्याने गावाचा कायापालट झाला असून या मध्ये गावठाण अंतर्गत पेव्हर ब्लॉक, स्मशान भूमी कंपाऊंड , क्रोंकिट रस्ता , गावठाण पेव्हर ब्लॉक रस्ता , दलीत वस्ती १.२५ कोटीची कामे, ठवाळ वस्ती , तुकाई वस्ती पवार वस्ती सिंगल फेज डीपी आमदार निधी , ८०० वृक्ष लागवड गावठाण परिसर MRGS, पाणंद रस्ते, खडी करण रस्ते मंजूर साठी ३० लाख निधी , ५५ लोकांना डोल मंजूर केला आहे .आ.रोहीत दादा पवार ७० हजार मतांनी निवडून येतील अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. तसेच निवडून आल्यानंतर तालुक्यासह सर्वच गावांचे नंदनवन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.






