
आजतागायत पर्यंत सन २०१९ पर्यंत आपला मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा आमदार होता. तरीही मतदार संघात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या स्वयंघोषित भुमिपुत्राला बाजुला सारून आ .रोहीत दादा पवार यांना विकास करणेकामी संधी दिली. त्यानुसार रोहीत दादांनी विकासाकामी आवश्यक असलेल्या मतदार संघात अनेक पायाभुत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आज आपला मतदार संघ हा अनेक गोष्टीवर आघाडीवर जात असल्याने तो पुढे नेण्यास नक्कीस आपल्यास विकासाला साथ दयावी लागेल. रोहीत दादांनी सर्व उणीवा लक्षात घेवुन विकासाचे व्हीजन ठेवून काम करत आहेत. विकासावर विरोधी नेते काहीही बोलत नाहीत. याबाबत आपला मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे आपणास रोहीत दादांना साथ देवुन आपल्या विकासाला साथ देणे आवश्यक आहे.
आपले भुमिपुत्र देखील १० वर्ष आमदार होते. त्यांना काही करता आले नाही. जिथे विकास करता येत नाही व झालेली प्रगती देखवत नाही. त्यावेळी काम केले असते तर आज भुमिपुत्र भुमिपुत्र म्हणण्याची वेळ आली नसती त्यामुळे आज जोराजोराने ओरडून भुमिपुत्राचा मुददा काढुन विकासकामांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हा केविलवाना दिसत आहे.
आपल्या तालुक्यांचा मतदार हा अत्यंत हुशार असुन त्यांनी विकासाला नक्कीच साथ देतील आणि रोहीत दादाला विजयी करतील.आ. रोहितदादा पवार यांचे नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व असून महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये ४३ हजार मतांनी निवडून आल्यानंतर आ .रोहित दादांचे फक्त निवडणुकी अगोदर दोन महिने काम होते तरी लोकांनी एवढा विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर त्याच कामाच्या रूपाने आ.रोहित दादा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले व प्रत्येकाचा हृदयामध्ये स्थान निर्माण केले म्हणून दिलसे दादा फिरसे दादा असे म्हणत त्यांनी आ.रोहीत दादा यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडी अडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामदार यांनी म्हटले आहे.
आ.रोहीत दादांचे नेतृत्व हे सर्वांना सामावून घेणारे असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . आ.रोहीत दादांच्या विजयासाठी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा संकल्प करत कार्यकर्तेच डोअर टू डोअर प्रचार करत आ.रोहीत दादा यांची विकासकामे हे मतदार राजाला सांगण्यात येत आहेत .
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात शास्वत विकास करत रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती,अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही.
अॅड.दिपक सुद्रिक
मतदार







