कर्जत जामखेड मतदार संघात विकासाचा मुद्दा शिल्लक नसल्याने राम शिंदे यांनी भुमीपुत्र हा मुद्दा फक्त सहानभूती मिळविण्यासाठी तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला : श्री.ज्ञानेश्वर आप्पासाहेब हगारे सोशल मीडिया तालुका सरचिटणीस 

Google search engine

भुमीपुत्र हा मुद्दा आ .राम शिंदे यांनी सहानभूती मिळविण्यासाठी त्याचा उपयोग केला. ज्या लोकप्रतिनिधीला मतदार संघातील लहान मुले ,विद्यार्थी,तरुण ,कष्टकरी , शेतकऱ्यांप्रती तळमळ आहे तो खरा भूमिपुत्र असल्याची प्रतिक्रिया श्री.ज्ञानेश्वर आप्पासाहेब हगारे सोशल मीडिया तालुका सरचिटणीस यांनी दिली.

कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार मतदार संघात आल्यापासून त्यांनी सर्व घटकांची काळजी घेतली. त्यामुळे कर्जत जामखेड मतदार संघाची सर्वत्र वेगळी ओळख निर्माण झाली

असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आ .रोहित दादा यांनाच निवडून द्या असे आवाहन श्री.ज्ञानेश्वर आप्पासाहेब हगारे , सोशल मीडिया तालुका सरचिटणीस

यांनी केले आहे. तालुक्यातील सर्वसामान्य मतदार राजा रोहित दादांच्या पाठीशी राहणार असून साधी राहणी,उच्च विचार सरणी असणारे नेतृत्व म्हणजे आ.रोहित दादा पवार हे आहेत .

आ.रोहित दादा पवार यांनी विकास कामांच्या आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क या जोरावर कार्यतत्पर आमदार रोहितदादा पवार हे एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मत दूरदृष्टी त्यांना भावते. मतदार संघात आता पर्यंत हजारो कोटींची कामे रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत . लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून रोहितदादा यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले . आ.रोहित दादा पवार यांचा मोठा जनसंपर्क असून मोफत पाणी वाटप ,आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात चांगले काम केले आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .