कोट्यवधी रुपयांच्या कामामुळे व मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आ.रोहित दादा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील : नितीन वांगडे साहेब

0
233
Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य जनता व विकासकाम रुपी आशीर्वादामुळे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघात २०१९ पेक्षा मोठे मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया नितीन वांगडे यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला. यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात गेल्या पाच वर्षात आरोग्य , शिक्षण ,कालवा दुरुस्ती , कुकडी अस्तरीकरण , आवर्तन नियोजन , वीज वितरण , मनरेगा अंतर्गत कामे , रोजगार हमी , लिंक लाइन, सौर ऊर्जा प्रकल्प , महिला आणि बालविकास ,सामाजिक उपक्रम, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, वीज , पाणी,नागरी सुविधा , कृषी व जलसंधारण , कुकडी नियमित आवर्तन , राष्ट्रीय महामार्ग, पाणंद रस्ते, सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप, बचत गट,आदी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी यावेळी निवडून येतील यात कोणतीही शंका नसेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आ.रोहित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे केली.कृषी विभागामार्फत ३३३ बंधारे ९.३० कोटी मंजूर करण्यात आले. जलसंधारण व पाणलोटच्या माध्यमातून जलसमृद्धी , जलसंधारण कामाच्या ५ वर्षात नव्याने पाणीसाठा ३५२ कोटी लिटर क्षमता निर्माण झाली .द्राक्ष पीक परिसंवाद , लिंबू उत्पादकांसाठी प्रशिक्षण , खते, बियाणे विक्रेत्यांशी संवाद , शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने उत्पन्नात वाढ , विहिरींच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३१८ कोटी रक्कम जमा झाली .कर्जत जामखेड तालुक्यात खरीप हंगाम २०२३ साठी १८१ कोटी रुपये पीक विम जमा झाला. प्रकल्पग्रस्तांना कुकडीच्या भुसंपादनाचा १७४.२२ कोटी मोबदला मिळाला.कर्जत जामखेडच्या सक्षम वीज पुरवठ्यासाठी १२० कोटी निधी मंजूर केला .तसेच २०१९ पूर्वीची रखडलेली पीक विम्याची ७१.४८ कोटी रक्कम मिळवून दिली .गायगोठा अनुदान २०.९९ कोटी , शेळीपालन शेड १.९२ कोटी , लंपी रोगाच्या लसीकरणासाठी स्वखर्चातून १.५० लाख डोस उपलब्ध करून दिले .तसेच ५ वर्षात कुकडी कालव्याखालील सिंचन क्षेत्रात ११ हजारावरून २२ हजार हेक्टर पर्यंत वाढ झाली.मनरेगाच्या माध्यमातून ७९५५ विहिरी , जलसंधारनाच्या माध्यमातून नव्याने सिंचनाखाली ५०१७ हेक्टर क्षेत्र आले.४०० शेळीपालन शेड , ५२ किमी कालवा अस्तरीकरण , तुर,कांदा , कापूस आदी पिकांसाठी १४ हमीभाव केंद्र ,कोल्हापुरी पद्धतीच्या बांधायचे लातूर टाईप बॅरेज मध्ये रुपांतरला मंजुरी , वखार महामंडळाच्या २ गोदामांची उभारणी,ठिबक सिंचन अनुदानात वाढ , शेतमाल हमीभावाने खरेदी साठी १४ केंद्रे , अटल भूजल योजना ,दूध उत्पादकांसाठी कार्यशाळा , जलसंवर्धन योजनेअंतर्गत १२ कोटी ९७ लाख निधी मंजूर,नदी खोलीकरण,शेतकऱ्यांना विश्वासात घेवून पाणी नियोजन , ऊस प्रश्नातून शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी हळगाव येथील कारखाना बारामती ऍग्रो मार्फत चालू केला ,आधुनिक शेतीची प्रयोगशाळा आदी कामे केली.