तुकाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मा.मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी अवर्षण प्रवण गावांना कायमस्वरूपी दिलासा दिला

0
258
Google search engine

 

केवळ निवडणुकीपुरता विषय ठरलेल्या तुकाई उपसा जलसिंचन योजनेस शासन दरबारी विशेष बाब म्हणून मंजुरी घेऊन ते काम प्रत्यक्षात सुरू करून शिंदे साहेबांनी आमच्या चिंचोलीसह जवळपास १९ अवर्षण प्रवण गावांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी कर्जत व जामखेड तालुक्यात ठोस स्वरूपात अनेक विकासकामे करून जनतेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावरती भर दिला. मतदारसंघात शाश्वत विकास करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेला पपई/सलाईनची पाईपलाईन म्हणून हिणवले गेले व आम्ही चारीने पाणी देऊ हे खोटे आश्वासन देऊन विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल केली व निवडूण आल्यांनंतर चारी तर सोडाच या योजनेचेही कामही बंद ठेवले. पुन्हा या भागातील नागरिकांना टँकरवरच अवलंबून ठेवण्याचे पाप यांनी केले. (या वर्षी सीना धरणातून उपसा योजनेद्वारेच आष्टी तालुक्यातील मेहकरी तलाव भरला गेला आहे). वरील गावातील लोकांनी आता आपल्या भल्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे.

प्रा.राम शिंदे साहेब यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतरच पुन्हा या योजनेच्या कामाला त्यांनी गती दिली. आता या योजनेचे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे.या माध्यमातून अवर्षण प्रवण गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. तूकाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थीना नम्र विंनती आहे की आपल्या हितासाठी, आपला पाण्याचा मूलभूत प्रश्न कायमस्वरूपी सोडवन्यासाठी, आपले सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणाऱ्या भूमिपुत्र आ. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे.

गणेश परशुराम काळदाते पा.

उपसरपंच,चिंचोली काळदात