माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब यांना विजयी करण्यासाठी थेटेवाडी ग्रामस्थांनी कंबर कसली असून थेटेवाडी समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या तर्फे आ.राम शिंदे साहेब यांना गेल्या वर्षी पेक्षा जास्त लीड देवून त्यांचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया गंगाराम खामगळ , कोंडीराम खामगळ , गोरख खामगळ , दादा टुले , संतोष कोरटकर , माणिक खामगळ , विठ्ठल गोफणे , तुकाराम गोफणे , भाऊ गोयकर , कांतिलाल कोरटकर व सर्व ग्रामस्थ थेटेवाडी यांनी व्यक्त केली .
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.यावेळी बोलताना ते म्हणाले की , आ.राम शिंदे साहेब यांनी थेटेवाडी गावाचा कायापालट केला असून जलयुक्त शिवार मूळे सर्व गाव दुष्काळ मुक्त झाला असून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे. मारुती मंदिर सभामंडप , डिकसळ ते थेटेवाडी रस्ता डांबरीकरण, तुकाई चारी पाईप लाईनद्वारे पाणी, अंगणवाडी साठी नवीन इमारत बांधकाम ११ लक्ष , स्मशानभूमी बांधकाम १० लक्ष , मारुती मंदिरा समोरील परिसरात पेव्हींग ब्लॉक , थेटेवाडी परिसरातील माळढोक आरक्षण हाटवले , भगत मांढरे वस्ती लाईट डीपी मंजूर , थेटेवाडी येथे तालीम मंजूर आदी कामे दिली.
माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. कर्जत तालुक्यातील सर्वच भाग अवर्षण ग्रस्त असून वेळेत सुटलेल्या कुकडी आवर्तनाने हा भाग बागायती म्हणून ओळखला जावू लागला आहे. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. जलयुक्त शिवार , नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .






