आपला तो आपलाच असतो या भूमिकेतून सर्वांनी प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या भुमीपुत्र प्रा. आ.राम शिंदे यांना साथ द्या : गणेश डोंबाळे , भाजप सरचिटनीस 

Google search engine

 

आ.रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे गेली .परंतु आ.पवार यांनी विकासाच्या नुसत्या थापा मारल्या , काम न करता नुसती जाहिरातबाजी केली.आपल्या मातीतला आपला भूमिपुत्रच आपले प्रश्न सोडवू शकतो आमदार प्रा .शिंदे साहेब हेच शास्वत विकास करू शकतात अशी पक्की खात्री सर्वसामान्य जनता तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आहे.म्हणूनच आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .

ते म्हणाले, माजी मंत्री प्रा .राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.

‘शाश्वत विकास’ काय असतो हे शिंदे साहेबांनी आपल्या ‘मंत्रिपदाच्या’कार्यकाळात दाखवून दिले.जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल केवळ राज्य नाही तर केंद्र पातळीवर घेतली गेली.याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.

सर्व ओढे , नाले खोलीकरण केले ही सर्व कामे झालेली आहेत .अंतर्गत रस्ते क्राँकिटकरन, बंधारे, डांबरीकरण,जलयुक्त शिवार, सभा मंडप ,वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र असून ते मोठ्या मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .