
आमदार रोहित दादा पवार यांनी शिक्षण , आरोग्य , नागरी सुविधा आदी क्षेत्रात केलेली कामे यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या कामावर समाधानी असून आता इतर पक्षांतील कार्यकर्ते हे देखील त्यांच्या कामाने प्रेरित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत . आ.शिंदे हे आ.रोहित दादांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामात खोडा घालत आहेत . आ रोहित दादा पवार यांच्याकडे व्हिजन असून त्यांनी गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक विकासकामे केली.
आ.राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून पराभव दिसू लागल्याने थापा मारायला हद्दच राहिलेली नाही. त्यांनी आ. रोहित दादा पवार यांच्या कुटुंबावर खोटे आरोप लावण्याचा सपाटा लावला आहे. पण आ.रोहित दादा हे गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना त्यांच्या सुख दु:खात मदत केली आहे. तुम्ही जो भूमिपुत्र वगैरे गप्पा मारत असाल तरी त्यांनी जवळच्या नातेवाईक असल्याप्रमाणे लोकांना मदत केली आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. राम शिंदे यांची सोशल मीडिया खोटी माहिती पसरवत आहे.
सामान्य लोकांना केलेल्या मदतीबद्दल खिल्ली उडवली जाते आहे. पण अशी मदत तुम्ही का केली नाही. असा सरळ सवाल जनता विचारत असताना त्यालाही न जुमानता वेगळच काहीतरी उत्तर मिळताना दिसत आहे.
रोहित दादा पवार हे मागच्या पाच वर्ष इथे आमदार राहिले आहेत. त्याची कामाची पद्धत गेल्या पाच वर्षांत लोकांना कळलेली आहे. त्यावर सामान्य जनता फिदा आहे. त्यांची सामान्य लोकाप्रती जुळून घेण्याची वृत्ती त्यांच्या मदत करण्याच्या पद्धती ह्या अनेकांनी अनुभवल्या आहेत. त्यामुळे ज्या काहीही गप्पा मारल्या जात आहेत. काही पक्ष प्रवेश वगैरे फारच जोराने दाखवले जात आहेत. त्यात अनेक गावांत भाजप मधील जे कार्यकर्ते मुळ प्रचारापासून बाजुला आहेत.
म्हणजे यातुन नेमक काय बाहेर येणार आहे. की उगाच प्रचार् आणि वातावरण निर्मिती साठी काहीही कांगावा केला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
त्यांना मतदार संघात असणारी तीन लाख जनता आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा तुमच्याकडे आहे का?? असा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर नाही असेच मिळत असेल तर किती वाईट आहे….!!!
त्यामुळे तुमच्या मुद्द्या पेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा तुमच्याकडे नाही. तशी यंत्रणा निर्माण करण्याचे कोणतेही लक्षण तुमच्याकडे दिसत नाही. ज्या पुढारी लोकांची तुम्ही भाऊ गर्दी भाजप दाखवत आहे. ते कधी जनतेच्या कुठे कामाला आले याची कधीतरी यादी घेऊन पहा.
खोटा प्रचार बरीच शिग गाठेल अस वाटत असल तरी सामान्य जनता गेल्या काही वर्षात बरीच हुशार झाली असल्याने ती त्या गोष्टींना कधीही भुलनार नाही.
पराभव समोर दिसताच विरोधकांची पाया खालची वाळू सरकल्याने ते बिथरले असून आ.रोहित दादांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.गेल्या २५ वर्षात भाजपच्या ताब्यात असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या ५ वर्षापूर्वी भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आणि वर्षानुवर्षाचा विकासाचा अणुशेष भरून काढत मतदारसंघात विकासाची भरारी घेतली आणि याच बळावर आता रोहित पवार यांचा विजय केवळ औपचारिकता असल्याचं दिसत आहे.
आमदार रोहित पवार यांनी मागच्या वेळेस कर्जत जामखेडमध्ये पिण्याची समस्या असताना स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.
आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मग मतदारसंघातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग, गावागावातील रस्ते, पूल बांधले, अद्ययावत शासकीय इमारती, पंचायत समिती कार्यालये, तलाठी कार्यालये, सर्व सुविधायुक्त तीन उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, SRPF केंद्र, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय केली.
आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाततील शेतकऱ्यांचा अडकलेला पीकविमा मंजूर करून आणला. मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी कसे आणता येईल याची काळजी घेतली. कधी नवे एवढा सीएसआर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ४०० शाळा स्वखर्चातून डिजिटल केल्या. ज्या बँका अगोदर महिलांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा देत होत्या.अशी परिस्थिती एकेकाळी होती. त्याच कर्जत जामखेड मतदारसंघात आता बँकांनी महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज दिले आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची परत फेड करण्याचे प्रमाण हे ९९ टक्के आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून वेळेत कर्ज भरल्या जात असल्यामुळे त्या बचत गटांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीचाही फायदा होत आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील ह्या लढतीकडे जरी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असले तरी या लढतीत आमदार रोहित पवार हे त्यांच्या विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाहीत अशीच चर्चा आहे.






