आ रोहीत दादांना मतदान रूपी सहकार्य करून कर्जत जामखेड मतदार संघाला नवीन दिशा देण्याचे काम करा :रामभाऊ जंजीरे

Google search engine

 

मा. रोहीत दादा पवार ,

 

आज सामाजिक दृष्टीकोनातून विचार केला तर अल्पावधीत आपल्या कुशाग्र बुद्धीने उदयास आलेले युवा आणि संस्कारी नेतृत्व आज त्यांनी सर्वसामांन्याच्या मनामध्ये आपली प्रतिमा निर्माण केली असे नेतृत्व आम्हाला कर्जत जामखेडच्या रणांगणावर पुन्हा पाहायचे आहे . अस संस्कारांने आणि नवीन विचारांने परिपूर्ण असलेले युवा नेतृत्वाने नेहमी जनतेशी सुसंवाद साधून जवळीक व आपुलकी निर्माण केली खरी आपल्या पणाची जाणीव नेत्वृत्वामध्ये पाहवयास मिळाली. आजचा राजकारण करणाचा दर्जा खुप खालच्या पातळीवर ढासळत चालला आहे . त्यामुळे सामाजिक विघटन होत चालले आहे . समाज जाती जातीत विखुरला जात आहे . मतभेद ,वादविवाद असंख्य प्रश्न समाजात विष पेरत आहे . मग अशा वेळी गरज असते सामजिक एकीकरणांची ही फक्त दिसुन आली युवा नेतृत्व आ.रोहीत दादांच्या रूपाने कारण त्यांनी धार्मिक संप्रादय च्या रूपाने साधु संताचे विचारधारा तसेच महिला सक्षमीकरण तसेच शैक्षणिक धोरण राबवित असताना चिमुकल्यापर्यंतचा प्रवास लक्षणीय आणि मनाला भावणारा आहे . तसेच वृद्धासाठी अंपगासाठी सुद्ध योगदान देण्याचा प्रयत्न दादांनी केला .दुसरी एक गोष्ट बारकाईने अनुभवली की आज पर्यत गावपातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य पर्यंत सहकारी योजना देण्यात नेहमी भेदभाव केला यांचा परिणाम तर ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आजही दिसुन येत आहे . परंतु रोहीत दादा हे अभ्यासु व्यक्ती मत्व असल्यांने त्याच्या राबवलेल्या यंत्रणेमुळे सर्वसामान्य च्यां समस्या त्यांच्याजवळ पोहच झाल्या व समस्या चे निवारण करण्याचे काम सुद्धा दादांनी कोणताही भेदभाव किंवा इतर पक्षाचा असा भेदभाव न करता मोठ्या अपुलकीने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले . ही कार्य करण्याची पद्धतीमुळे रोहीत दादा नीं सर्व सामान्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या प्रतिमा निर्माण केली . जर येणाऱ्या काळात विकास साधायचा असेल सामाजिक विचार आणि सामाजिक संघटन खुप मजबुत होणं गरजेचे आहे . त्यांच कर्जत जामखेड मध्ये पाऊल पडताच आरोग्य , रस्ते, पाणी समस्या तसेच वरीष्ठ पातळीवरून आणलेली विकास कामे आणुन झपाट्याने होत असलेला बदल आज सर्व समाज उघड्या डोळ्याने पाहत आहे . हा बदल जनतेने सुद्धा स्विकारला आहे येणाऱ्या काळात त्यांच्याकडे असणारे विकासाचे व्हिजन तसेच अभ्यासु व्यक्तीमत्व मुळे येणाऱ्या काळात कर्जत जामखेड चा विकासात अजुन भर पडेल .त्यामुळे सर्व मतदार बंधूना विनंती करतो येत्या काळात रोहीत दादा मतदान रूपी सहकार्य करून समजाला नवीन दिशा देण्याचे काम आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे .