भुमीपुत्र हा मुद्दा फक्त सहानभूती मिळविण्यासाठी ,  मोदी गुजरातचे असून त्यांचा लोकसभा मतदारसंघ उत्तरप्रदेश मधील वाराणशी हे विसरले का  ? ज्याला मतदार संघातील बालक,विद्यार्थी,तरुण , शेतकऱ्यांप्रती तळमळ आहे तो खरा भूमिपुत्र : लक्ष्मण (आण्णा) सुद्रिक ,शिवसेना उबाठा उपविभाग प्रमूख

Google search engine

 

 

कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार मतदार संघात आल्यापासून तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आ .रोहित दादा यांनाच निवडून द्या असे आवाहन लक्ष्मण (आण्णा) सुद्रिक ,शिवसेना उबाठा उपविभाग प्रमूख यांनी केले आहे. शिवसेना उबाठा खंबीर पणे  आ. रोहित दादांच्या पाठीशी राहणार असून साधी राहणी , उच्च विचार सरणी असणारे नेतृत्व म्हणजे आ.रोहित दादा पवार हे आहेत .

आ.रोहित दादा पवार यांनी विकास कामांच्या आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क या जोरावर कार्यतत्पर आमदार रोहितदादा पवार हे एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मत दूरदृष्टी त्यांना भावते. मतदार संघात आता पर्यंत हजारो कोटींची कामे आ.रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत . लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून आ.रोहितदादा यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले . आ.रोहित दादा पवार यांचा मोठा जनसंपर्क असून पाणी,आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात चांगले काम केले आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .