लोकप्रिय आमदार रोहीत दादा पवार साहेब थोड्याच दिवसात मंत्रीपदाची शपथ घेतील : धुळा शेठ टुले 

Google search engine

 

 

रुईगव्हाण चे विद्यमान सरपंच सौ.मंगला टुले यांचे चिरंजीव धुळा शेठ टुले यांनी कार्यसम्राट लोकप्रिय आमदार रोहीत दादा पवार साहेब हे थोड्याच दिवसात कर्जत जामखेडच्या आमदारकीचे नाही तर मंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले , आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मतदारसंघातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग, गावागावातील रस्ते, पूल बांधले, अद्ययावत शासकीय इमारती, पंचायत समिती कार्यालये, तलाठी कार्यालये, सर्व सुविधायुक्त तीन उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, SRPF केंद्र, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय केली.

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाततील शेतकऱ्यांचा अडकलेला पीकविमा मंजूर करून आणला. मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी कसे आणता येईल याची काळजी घेतली. कधी नवे एवढा सीएसआर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ४०० शाळा स्वखर्चातून डिजिटल केल्या. ज्या बँका अगोदर महिलांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा देत होत्या.अशी परिस्थिती एकेकाळी होती. त्याच कर्जत जामखेड मतदारसंघात आता बँकांनी महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज दिले आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची परत फेड करण्याचे प्रमाण हे ९९ टक्के आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून वेळेत कर्ज भरल्या जात असल्यामुळे त्या बचत गटांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीचाही फायदा होत आहे. यावेळी त्यांचे सहकारी ईश्वर शिंगटे , बप्पू टुले , बच्चन साबळे , ईश्वर खटके , आबा रुपनर , देवा रुपनर , शहाजी रुपनर , अविनाश पवार , शिवाजी शिरसागर , तात्यासाहेब रुपनर , शिवाजी तांबे , काका शिंगटे , मनोज शिंगटे ,किशोर रजपूत किशोर ढवळ , अनिल गडदे , गोविंद गोसावी , नितीन ठवाळ , सतीश काळे , हेमंत काळे, आबासाहेब काळे, गणेश काळे, भाऊसाहेब थोरात , सुभाष खरात , सचिन रुपनर , माजी रुईगव्हाण ग्रामपंचायत सदस्य खटके आदी यावेळी उपस्थित होते .