आ.रोहित दादा पवार यांचा विजय निश्चित : सुरज खेडकर , रवळगाव

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य जनता व विकासकामरुपी आशीर्वादामुळे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघात २०१९ पेक्षा मोठे मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया सूरज खेडकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला.

यावेळी संतोष खेडकर चेअरमन पोपट खेडकर , विजय खेडकर , सोमनाथ खेडकर , दादा वायाळ , प्रकाश खेडकर , कृष्णा खेडकर , अण्णासाहेब खेडकर उपस्थित होते.

रवळगाव साठी आ.रोहीत दादांनी कोंभळी ते रवळगाव रोड , खंडोबा मंदिर सभा मंडप , रासकर वस्ती काँक्रिटीकरण , मुस्लिम बांधव दफन भूमी कंपाऊंड , उन्हाळ्यात स्व .खर्चाने मोफत टॅंकरने पाणी व्यवस्थापन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात गेल्या पाच वर्षात आरोग्य , शिक्षण , महिला आणि बालविकास ,सामाजिक उपक्रम, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, वीज , पाणी,नागरी सुविधा , कृषी व जलसंधारण , कुकडी , सिना नियमित आवर्तन , राष्ट्रीय महामार्ग, पाणंद रस्ते, सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप, बचत गट,आदी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी यावेळी निवडून येतील यात कोणतीही शंका नसेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे .