आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील : बाबासाहेब कायगुडे 

Google search engine

 

माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून त्यांचा विजय सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने निश्चित असल्याची प्रतिक्रिया बाबासाहेब कायगुडे यांनी व्यक्त केली . यावेळी बोलताना म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया बाबासाहेब कायगुडे यांनी दिली.

तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .